
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोक प्रतिनिधी, राजकीय पुढारी आणि सामाजिक कार्यकर्ते हे सर्व सामान्य कुटुंबातील समाजशिल लोक संपर्कातील महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जातात आम्ही जेव्हा गावा गावात लोक संपर्कात असतो तेव्हा गरीब सामान्य कुटुंबातील मानसं अशा अनेक व्यथा आमच्या समोर मांडताना दिसत आहे म्हणून आमचे मत सोशल मीडिया च्या माध्यमातून आदिवासी पुढारी असेल किंवा लोक प्रतिनिधी असेल, यांच्या पर्यंत पोहचवत आहोत मेंढला येथिल गरीब कुटुंब कासार परीवार ( कोलाम समाज ) अंकुश कासार प्रामाणिक समाज प्रेमी यांच्या बहिणीच्या लग्नासाठी सर लोकांना आमंत्रित केले परंतु हे पुढारी फक्त निवडणूक आली की उगवतात मग सामान्य कुटुंबातील लोकांच्या काय अडचणी आहेत या लोक प्रतिनिधी ला काही देणे घेणे रहातं नाही,सुख दुःख तर माहीतच नाही अशा अनेक भावना मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या समोर कोलाम समाजातील लोकांनी व्यक्त केल्या राजकीय पक्षाचे पुढारी, आणि लोकप्रतिनिधी हे जातियवादी प्रवृत्तीचे झाले आहे, यांना समाज प्रेमा पेक्षा पक्ष प्रेमाची लोभिष्ट लक्षणं यांच्या मध्ये दिसुन येते अशा लोकप्रतिनिधी नी गरीब सामान्य कुटुंबातील व्यक्ती ला दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे असा गर्भित इशारा मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी मेंढला येथिल कोलाम समाजातील कासार परीवारातील लग्न प्रसंगात दिला या प्रसंगी उपस्थित मा श्रावण पाडसेनेकुन, दिनेश खडकी, सुधाकर चांदेकर ,कासारकर साहेब अक्षय नाईक धर्मराज चांदेकर गिरीधर मांगुळकर , आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
