
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)
प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ‘ड’ धानोरा येथील यादी मध्ये 260 लाभार्थ्यांची एकूण यादी होती,त्या यादीमधून 91लाभार्थी गावातील अति गरजू ,पडक्या,मातीच्या घरात राहणाऱ्या लोकांना अपात्र दाखविले त्या लोकांची खोटी माहिती दाखवून त्यांना घरकुला पासून वंचित ठेवण्यात आले, आणि गावातील अनेक गरजू लाभार्थ्यांना घराचे पट्टे नसल्यामुळे सुद्धा वंचित राहावे लागत आहे तरी त्या लाभार्त्यांची प्रशासनाने फेर तपासणी करून त्या लाभार्त्याना योग्य तो न्याय देण्यात यावा अन्यता ग्रामपंचायत धानोरा व 91 गाळलेल्या गरजू लाभार्त्यांचा प्रशासनाला उपोषणाला बसण्याचा इशारा व तालुक्यात अनेक ठिकाणी अशाच प्रकार चालू आहे माननीय तहसीलदार साहेब यांनी या प्रकाराकडे लक्ष द्यावे असे जनसामान्य लोक म्हणतात आहे.
