
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्राविका ही शेतकऱ्यांची संस्था आहे ग्राविकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा ही ग्राविकाच्या माध्यमातून पूर्ण होते राळेगाव ग्राविका ही उत्पन्नाच्या बाबतीत मजबूत आणि सशक्त आहे या ग्राविकाने आणखी विकास करावा तसेच शेतकऱ्यांच्या समस्या असल्यास त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे आश्वासन खासदार संजय देशमुख यांनी राळेगाव ग्राविका भेटीदरम्यान दिले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन हूरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक कृष्णा राउळकर अशोक पिंपरे गजानन पाल नितीन महाजन आदी उपस्थित होते यावेळी विविध प्रश्नांवरती खासदारांसोबत चर्चा झाली त्यामध्ये मेंगापूर रोडवरील नाला खोलीकरण व सरळीकरण करणे या संदर्भात खासदारांना सांगितले तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत याबाबत चर्चा केली तसेच या प्रश्नावरती बैठक लावायचे सुद्धा ठरले सोबतच ग्राविकाने विविध उद्योग करावे ज्याच्या माध्यमातून संस्थेचा विकास करावा उद्योग स्थापन करण्यासाठी जी मदत लागेल ती खासदार म्हणून आपण करण्यास तयार आहोत हे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले यावेळी महिला आरक्षण पिक विमा आदि विषयावर सुद्धा खासदार यांनी यावेळी चर्चा केली सदिच्छा भेटी वेळी संस्थेचे सचिव प्रदीप सोयाम सहसचिव अजय भावे कर्मचारी शंकर पिंपरे राहुल पचारे चैतन्य पिंपरे साहिल झुणघरे आदी उपस्थित होते
