
वणी तालुक्यातील सुकनेगावात 1500 ते 1600 लोकसंख्येचे गाव आहे.सुकनेगावात अवैधरित्या दारू विक्रीने गावातील कित्येक कुटुंब उद्धवस्त केले आहे.गावातील महिलांनी पोलीस प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन देखील ग्रामस्थांच्या निवेदनाला केराची टोपलीच दाखवली आहे.
अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या वर कोणतीही कारवाई होत असल्याचे दिसत नसल्याने गावातील महिला हतबल झाल्या आहेत.राजकिय पुढारी असो की पोलीस प्रशासन गावकऱ्यांनी सर्वांना मदत मागितली मात्र कोणतीही मदत गावकऱ्यांना मिळाली नाही उलट दारूविक्री करणाऱ्यांची दादागिरी वाढल्याचे दिसून येत आहे.
