मारेगावच्या भूमीअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

भुमिअभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकासह लिपिक 15 हजार रूपयाची लाच घेताना अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. मारेगाव भुमिअभिलेख सहाय्यक प्रभारी उपअधीक्षक बबनराव श्रीनिवास सोयाम ( वयवर्ष 56, रा. वैभव नगर, आखाडा वार्ड पांढरकवडा) व लिपिक अविनाश चंद्रकांत पाटील (रा. मारेगाव) यांनी 15 हजाराची लाच घेतली आहे. या प्रकरणी मारेगाव येथील व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाच घेणारे बबनराव सोयाम हे मारेगाव येथील प्रभारी उपअधीक्षक म्हणून आहे, तर अविनाश पाटील हे लिपिक म्हणून भूमिअभिलेख कार्यालयात नोकरीला आहेत.

तक्रारदारांच्या मौजे मारेगाव येथील जमीनीची मोजणी करून देण्यासाठी सोयाम व पाटील यांनी त्यांच्याकडे 15 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. एसीबीच्या पथकाने 5 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मारेगाव भुमीअभिलेख कार्यालयात सापळा रचला. सोयाम व पाटील यांनी तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच स्विकारल्यानंतर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस अधिक्षक विशाल गायकवाड, अमरावती परिक्षेत्र अधिक्षक अरूण सांवत, अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक एसीबी अमरावती, संजय महाराज उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष इंगळे, पोलीस निरीक्षक युवराज राठोड, निलेश महिगे सतिश कुटकुले यांनी ही कारवाई केली.