
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत येत असलेल्या परसोडा येथील सहकारी सोसायटीचे अध्यक्ष किशोर कांडूरवार, सचिव मंगेश कारमोरे यांच्या पुढाकाराने मार्च पर्यंत १०० टक्के कर्ज वसुली करून यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावणारी एकमेव राळेगाव तालुक्यातील परसोडा ग्राम विविध सहकारी सोसायटी बनली आहे सदर सोसायटी अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण शेतकऱ्यांना मार्च पर्यंत १०० टक्के कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना परत कर्ज वाटप करून यवतमाळ जिल्ह्यात या ग्राम विविध सहकारी सोसायटीने प्रथम क्रमांकाचा नंबर पटकावला आहे. सदर यवतमाळ जिल्ह्यात सर्वप्रथम शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणारी एकमेव सहकार सोसायटी म्हणून परसोडा सोसायटीचे परिसरात सध्या नाव चर्चेमध्ये आहे. तर शेतकऱ्यांना वेळेत कर्ज वाटप व्हावा म्हणून संस्थेचे अध्यक्ष किशोर कांडूरवार, सचिव मंगेश कारमोरे यांनी मोठे परिश्रम घेतले आहे तर संस्थेच्या अध्यक्षाचे व सचिवांचे वाढोणा बाजार मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी कन्नाके, तेजस सरोदे रोखपाल, मनोज पटले लिपिक, सुदर्शन पेंदाम लिपिक, संजय भोयर शिपाई यांनी आभार मानले आहे
