
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्राम स्वराज्य महामंच यांच्या पुढाकाराने सामाजिक विचाराने प्रेरित झालेली सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत आणि काही कवी अभ्यासक यांच्या विचारांची सहविचार सभा आयोजित केली होती. कार्यक्रमाचे आयोजन मा. मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या पुढाकाराने घेण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा,प्रा मनोहर जी मेश्राम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा मा मनोज जी गेडाम साहेब जिल्हा उपायुक्त सांख्यिकी कार्यालय यवतमाळ मा.धनराज जी पुरके साहेब आणि मा.नरेशजी गेडाम यांच्या उपस्थितीत लोक आग्रहास्तव घेण्यात आली आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ते सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला . सामाजिक विचार मंथन करताना आदिवासी समाजात जातियवाद वाढताना दिसत आहे. आदिवासी संघटना चे प्रमुख पदाधिकारी एकत्र येऊन समाजातील लोक गटातटाच्या भोवऱ्यात सापडली असेल तर असे सामाजिक दृष्ट्या योग्य नाही. अशा डोळस बुद्धी ने विचार करून सामाजिक एकोपा कसा निर्माण होईल या विचाराने विचार मंथन आढावा बैठक घेण्यात आली होती. या विचार मंथन आढावा बैठकीत समाजातील सहभागी लोकांनी आप आपली मतं व्यक्त केली . सामाजिक विचार मंथन कार्यक्रमांत विशेष व्यक्तीमत्व सौ. विशाखा यवतकर (प्रसिद्ध कवयित्री ) यांच्या ” जिंदगाणी ” या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. आदिवासी समाजातील अनेक कार्यक्रम समाज प्रबोधन म्हणून होतात. परंतु समाजातील लोकांना विचार मंथन करून समाजातील गटबाजी दुर केली पाहिजे या साठी ” सामाजिक विचार मंथन सभा ” चे आयोजन झाले पाहिजे असे स्पष्ट मत मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी व्यक्त केले होते. या कार्यक्रमात सहभागी मा अजय यवतकर डॉ विलास कनाके विश्वास कुभेकर चिंतामण किनाके, बंडू जी पंधरे चिंतामण दाभेकर सौ विशाखा यवतकर ,मा आकाश मेटकर मा शैलेश गाडेकर अध्यक्ष शामा दादा ब्रिगेड मा कृष्णा भोंगाडे,मा विश्वास कुभेकर,मा शंकर कोवे अशी अनेक समाजातील मंडळी सहभागी झाली होती आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन मा चिंतामण दाभेकर, शामा दादा कोलाम विचार मंच यांनी केले सर्वांना स्वादिष्ट जेवण देवून, कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
