स्थानिक नेत्यांन मुळे काँग्रेस पक्ष मुस्लिम मताला मुकणार!

प्रतिनिधी शेख रमजान


उमरखेड महागाव विधानसभा मध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांची निवडून येण्याची जास्त शक्यता असल्याचे चित्र असताना. उमरखेड मधील ढाणकी या गावातून मुस्लिम समाजाचा काँग्रेस पक्षाला मतदान न करण्याचा सूर निघत आहे. याचे कारण येथील काँग्रेसचे स्थानिक नेते असल्याचे समोर येत आहे.
ढाणकी गावात विधानसभा निवडणूक मध्ये कोण प्रचम फडकवणार म्हणून सर्वे केले असता ढाणकी भागात मुस्लिम वर्गात असे बोलल्या जात आहे की, काही स्थानिक नेते म्हणत आहे की,आम्ही मुस्लिम समाजाचे नेतृत्व करत आहे,आम्ही जे म्हणेल ते मुस्लिम समाज करणार असल्याचे अविर्भावात उमेदवाराकडे फिरून आपले खिसे गरम करत आहे, ते आपले खिसे गरम करत असताना ते आमच्या मताचे सौदा करत असल्याचे कळत आहे. त्यांनी आमचे नेते म्हणून कधीच आमच्यावर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठवला नाही, उलट आमच्या समाजातील निअपराध लोकांनवर कार्यवाही होऊन त्यांना जेल मध्ये टाकण्यात आले तेव्हा सुद्धा समोर येऊन यांनी जाब विचारला नाही, कधी आमच्या विकासासाठी आमदार, खासदार यांना जाब विचारला नाही म्हणून आम्ही त्यांना आमचे नेते मानत नसून हे कोणत्या तोंडाने आम्हाला मतदान मागत आहे. आमच्या समाजाचे कोणी नेते नसून आम्ही कोणाच्या ईशाऱ्यावर मतदान करणार नाही. जर कोणी ढाणकी येथील स्थानिक नेते घेऊन आमच्या घरी मतदान मागायला येत असेल त्याचा आम्ही बहिष्कार करण्याचे पवित्रा मुस्लिम समाजाने घेतला आहे.

आमच्या मुस्लिम समाजाने काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळेस मतदान केला आहे. पण काँग्रेस आमचा मतदान साठीच उपयोग करत आहे. त्यामुळे आम्ही आज काँग्रेस पक्षाला आमच्या पुढील मागण्या मागत असून


1)मुस्लिम शादीखाना उपलब्ध करून देणे
2)नवीन मुस्लिम कब्रस्थान जागेसह उपलब्ध करून देणे
3)ढाणकी येथील पाणी टंचाई दुर करावी
4)टेंमेश्वर नगर येथील शासन हटवून तेथील लोकांना मालकी हक्क देणे.
हे मागण्या काँग्रेस पक्ष मान्य करत असेल तर माझा मत त्यांना देईल
ढाणकी नागरिक
सयद खालिद


साहेबराव कांबळे ढाणकी येथे मुस्लिम समाजाला भेटून त्यांची समस्या जाणून ते मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.