

सहसंपादक -रामभाऊ भोयर
पूरातन श्रीराम मंदीरात श्रीरामनवरात्रोत्सवानिमीत्त 9 दिवस भजन,किर्तन,प्रवचन व विविध मंडळाचे सत्संग रोज आयोजित करुन देवस्थान समितीनने छान योग साधला.यामध्ये ज.न.म.संत्संग,निरंकारी संत्संग,मेहेरबाबा आरती,गुरूदेव मानव सेवा मंडळ,वारकरी भजन मंडळ,बाल गणेश मंडळ, गुरुमाउली बाल भजन मंडळ तसेच गावातील अनेक महीला व पुरूष मंडळांनी आपली कलात्मक व भावयुक्त सेवा सादर केली. देवळी येथील श्री सुरेन्द़ मुळे यांनी 3दिवस आपल्या संचासहीत किर्तनसेवा करुन रामजन्मोत्सव व गोपालकाल्याचा प्रसंग साजरा केला. दि.31ला महाप्रसादाने उत्सवाची सांगता झाली.गावातील अनेक बंधुभगिनींनी याचा लाभ घेतला.या उत्सवात मंदीरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.आयोजनात मंदीराचे संचालक मंडळ,सामाजिक क्षेत्रातील लहान थोर मंडळीचे अमुल्य सहकार्य लाभले .नवरात्रात पौरोहीत्य श्री.जिवन भाकरे झाडगाव यांच्याकडे होते तर 10 दिवस महापूजेचा सन्मान गावातील विविध दंपतीने स्विकारला.नवरात्रातील सर्व कार्यक्रम दिलेल्या वेळेत संपन्न झालेत.हे विशेष.मंदीराचे पूजारी श्री.महादेव जाधव व व्यवस्था प्रमुख योगेश पारीसे यांनी कार्यक्रमासाठी खुप परीश्रम घेतले
