राळेगाव तालुका प्रतिनिधी :-रामभाऊ भोयर (9529256225)
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्ट बी हा राळेगांव शहरातून भर रहदारी च्या दोन किलोमीटर अंतरावरुन जातो,सर्व सोई सुविधा सवलती दिल्या आहेत असं गोड आश्वासन देऊन हा सिमेंट रोड पूर्ण झाला.पण पण रस्त्याच्या मधोमध लावलेले “स्ट्रिट लाईट” कोठे चालू तर कोठे सदैव बंद अशा अवस्थेत आहे.
आठवड्या आधी याच चालू बंद मुळे दोन कुटुंब प्रमुखांना अक्षरश एका चारचाकी वाहनाने चिरडून टाकले,यात काही च दोष नसताना यांचे कुटुंब उघड्यावर पडले.
नगर पंचायत राळेगांव च्या अधिनस्त ही सर्व व्यवस्था आहे असं सर्व प्रशासकीय यंत्रणा वेळोवेळी सांगतात,अपघात घडला त्या नंतर तीन दिवस दोन किलोमीटर अंतरावरील ही सर्व मुख्य स्ट्रिट लाईट सुरु होती.त्या नंतर बंद बंद बंद हे काय गोडबंगाल आहे हे मात्र नागरिकांना कळत नाही.
राळेगांव शहरात दररोज छोटे मोठे अपघात होतात,याची वेगवेगळी कारणं आहेत,पण रात्री अंधार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तिनशे एकसष्बी वरुन भरधाव वेगाने वाहन जाणार आहे,अपघात होऊ नये या साठी हे दोन किलोमीटर अंतरावरील स्ट्रिट लाईट निदान रात्री तरी सुरु हवीत एवढिच अपेक्षा नागरिकांना आहे.
