
हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे दरवर्षी मोहरम ( ताजीया ) उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो .
यंदाच्या वर्षी कोरानाची पार्श्वभुमी लक्षात घेऊन मोहरम उत्सव साध्या पणाने साजरा करणार असल्याची माहीती शमु पाटील
यांनी दिली . आज आपल्या मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते मोहरम ताजीया सभागृहाचे उदघाटन करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून मोहरम ताजीयाची जागा बाधकामापासुन वंचित राहू लागली तेव्हा आमदार साहेब यांनी आपल्या स्थानिक निधीतून एक सार्वजनिक सभागृह बांधुन दिले व येणाऱ्या काळात महादेव देवस्थान यानावाने हानुमान मंदीरा समोर एक सभामंडप मजुरकरुन देऊ असे आश्वासन यावेळी उपस्थित गावकऱ्यां समोर दिले आहे.मोहरम ताजीया हे सण करंजी या गावी चांगल्या पद्धतीने सर्व समाजातील लोक एकत्र येऊन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्यानिमित्ताने मोहरम ताजीया सभागृहाचे पकेबाधकाम पुर्ण झाले आणि समाजाला एक सार्वजनिक सभागृह देखील उपलब्ध झाले आहे या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती हिमायतनगर तहसीलदार डि एन गायकवाड व तसेच मुख्याध्यापक गजाननराव सुर्यवंशी सर प्रसिद्ध व्यापारी रफीक सेट माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अल्ला राठोड तहसीलचे लीपीक भालेराव सर मार्केट कमिटी सभापती डॉ प्रकाश वानखेडे पत्रकार दैशोन्तीचे परमेश्वर गोपतवाड साहेब शिवाजीराव शिरपुल्लीकर संतोष पाटील वाघीकर बबु पाटील टेंभी कर करंजी ग्रामपंचायत सरपंच बालाजी पुठ्ठेवार उपसपच पांडुरंग सुर्यवंशी माजी सरपंच दशरथ वाघमारे पो पाटील बाबुराव मिराशे नासरखा पठाणव सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
बऱ्याच वर्षापासून मोहरम (ताजीया ) उत्सव हा रेणापुरवासी मोठ्या उत्साहात साजरा करतात .सामाजीक बांधीलकी जपणारे
मौजे रेणापुरचे जावीद पठाण यांनी दरवर्षी गावातील नागरिकांना सोबत घेऊन सामजस्यपणाने मोहरम ( ताजीया ) उत्सव समिती स्थापन करून सामाजीक उपक्रम राबवितात .
. मोहरम ( ताजीया ) उत्सव निमीत्त समाज प्रबोधन कार्येक्रम राबविला जातो . ग्रामीण भागात मौजे रेणापुर येथे हिंदू मुस्लीम बौद्ध बांधव हे एकोप्याने वागतात .सण उत्सव महापुरुषाची जयंती मोठ्या उत्साहात एकादिलानेसाजरी करतात .यंदाच्या वर्षी मोहरम उत्सव दिनाचे औचित्य साधुन दि. १६ ते १८ पर्यंत कार्यक्रम कोरोनाची पार्श्वभुमी लक्षात घेऊन साध्या पध्दतीने साजरा करणारअसल्याची माहिती शमु पाटील यांनी दिली
,+(रिपोर्टर परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर जिल्हा नांदेड )
मो 9561564941
