गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कापसाची दुप्पट खरेदी
सीसीआयचा वाटा नगण्य; आता भाववाढीची अपेक्षा नसल्याने विक्रीसाठी घाई

सहसंपादक : रामभाऊ भोयर

बाजार समितीमार्फत राळेगाव व उपबाजार वाढोनाबाजार व खैरी या केंद्रावर कापसाची खरेदी केली जाते गेल्या वर्षी 30 जानेवारीपर्यंत दोन लाख 38 हजार क्विंटल कापसाची खरेदी बाजार समितीमार्फत करण्यात आली होती ती यावर्षी पाच लाख साठ हजार क्विंटल वरती गेली आहेत म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुप्पट कापसाची खरेदी बाजार समितीमार्फत करण्यात आली आहे।।।। एकीकडे यावर्षी कापसाची दुप्पट खरेदी करण्यात आली तरी यामध्ये सीसीआयचा वाटा मात्र नसल्यात जमा आहे तीनही केंद्रावर सीसीआय मार्फत केवळ सात हजार 53 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे हे विशेष गेल्या वर्षी कापसाचे भाव वाढेल या आशेने शेतकऱ्याने आपल्याकडील कापूस रोखून ठेवला होता गेल्या वर्षी गरज असेल तेवढाच कापूस शेतकरी विकत होते कारण त्याच्या आदल्या वर्षी कापसाचे दर हे 14 हजार रुपये क्विंटल पर्यंत गेले होते त्यामुळे भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनि आपल्याकडील कापूस रोखून ठेवला होता पण शेवटी नऊ हजार क्विंटल रुपये वरील भाव सात हजार रुपयावरती आले वआजही त्याच्या आसपासच भाव असल्याने भाव वाढणार नाही असे शेतकऱ्याला वाटत असल्याने शेतकऱ्याने आपल्याकडील कापूस विकण्याचा सध्या सपाटाच लावला आहे जाणकारांच्या मते जवळपास 65 टक्के शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस विकला असल्याचे समजते गेल्या वर्षी कापूस भाव वाढीचा इतका धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे की शेतकरी या वर्षी कापूस ठेवण्याच्या मानसिकतेत नाही कारण भाव वाढीचा मोठा फटका गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बसला होता काही शेतकऱ्यांनि जर कापूस ठेवला तर इतर शेतकरी कापूस ठेवतात पण यावर्षी तसे नसल्याने बहुतांश शेतकरी कापूस विकत आहेत सद्यस्थितीत कापसाची आवक ज्या प्रमाणात सुरू आहे ते पाहता या वर्षीचा हंगाम मार्चपर्यंत संपेल कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्यावर्षीचा काही कापूस यावर्षी विकायला येत आहे हे विशेष ।।। सीसीआयकडे फिरवली शेतकऱ्यांनी पाठ ।।एकतर तालुक्यात सीसीआय ने उशिरा खरेदी सुरू केली त्यातही सीसीआयचा भाव आणि खाजगी बाजारात मिळत असलेला भाव यामध्ये फारशी तफावत नसल्याने शेतकरी सीसीआयला कापूस देण्याचे टाळत आहे या शिवाय शेतकऱ्याला सीसीआयला डायरेक्ट कापूस विकावा लागतो तर दुसरीकडे खाजगी व्यापाऱ्यांना शेतकरी दलालामार्फत कापूस देतात परिणामी शेतकऱ्याला पेमेंट साठी वाट पाहावी लागत नाही यामुळे अनेक शेतकरी आपला कापूस खाजगी व्यापाऱ्यांना देतात ज्यामुळे सीसीआयची खरेदी ही केवळ 7 हजार 53 क्विंटल झाली आहे सद्यस्थितीत सेंटर इन्चार्ज यांची बदली झाल्याने राळेगाव येथील सीसीआयचे सेंटर बंद आहेत पण तालुक्यातील इतर दोन सेंटर सुरू आहेत नवीन सेंटर इंचार्जे आल्यास सीसीआय पुन्हा खरेदी सुरू करेल सीसीआयला जरी अल्प प्रतिसाद मिळत असला तरी सीसीआयने शेवटपर्यंत कापसाची खरेदी तालुक्यात करावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत