वणीच्या गांधी चौकातील 160 गाळे लिलावासाठी,उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा आदेश


लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन

नितेश ताजणे वणी –

वणी येथे गांधी चौकात असलेल्या नगर परिषदेच्या 160 दुकान गाडे भाडे तत्वावर ई- लिलाव पध्दतीने हरास करण्यासाठी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने रिट पिटीशन क्रमांक 181/2020 चे आदेशान्वये गांधी चौकातील गाडे लिलाव करण्याबाबत आदेशीत केले आहे. उच्च न्यायालयाचे आदेशात अधीन राहून वणी शहरातील शी.न. 19 अ व 19 ब गांधी चौकामधील एकूण 160 दुकान गाडे भाडे तत्वावर दे यासाठी ई- लिलाव करायचा आहे. सदर दुकान गाडे करिता निश्चित करण्यात आलेले मासिक भाडे स्थिर ठेवून अनामत रक्कमेवर इ लिलाव करण्यात येईल. 160 दुकान गाडे भाडेपट्ट्यावर देण्यासाठी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 92(3) महाराष्ट्र नगरपालिका नियम 1983 स्थायी निर्देश क्रमांक 24 शासन निर्णयामधील अटी व शर्ती यास अधीन राहून ई-लिलाव प्रसिद्ध करण्यात आली आहे. ई- लिलाव प्रक्रियेचा तपशील व दुकान गाडे भाडे पट्टीवर वाटप करण्याकरिता निश्चित केलेल्या भाडे विषयक, पात्रता विषयक, प्रत्येक गाड्यांचा तपशील व इतर अटी व शर्ती नगर परिषद कार्यालय तसेच www. education.gov.i या संकेत स्थळवर Auction- ID क्रमांक 2022 MH-15756 अन्वय दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पासून सकाळी 11.00वाजता पासून उपलब्ध आहे. तेव्हा शहरातील नागरिकांनी व लिलावधारकांनी अटी व शर्ती काळजी पूर्वक वाचाव्यात कारण गाडे बोली अनामत रक्कम प्रति गाडे 50000/- रुपये ,ई-लिलाव फी प्रति गाडे 2000/- रुपये आहे. ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरिता Digital signature certificate (DSC) असणे आवश्यक आहे. ई-लिलावात सहभागी होण्यासाठी पात्रता मिळविणे ,ई-लिलावात पात्रता ठरविण्यासाठी कार्यालयीन कालावधी, ई-लिलाव पात्र झाले नंतर प्रत्येक्ष ई -लिलावात बोली बोलणे ग्रुप A-40, ग्रुप B-40, ग्रुप C-40, ग्रुप D-40 असे एकूण 160 गाड्यांचा लिलाव होत आहे . तेव्हा शहरातील नागरिकांनी गाडे लिलावाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. समजा लिलावधारकाना लिलाव प्रक्रियेबाबत काही शंका किंवा अडचणी असल्यास संपर्क साधावा असे मुख्याधिकारी अभिजित वायकोस व प्रशासक नगर परिषद यांनी पत्राद्वारे सांगितले आहे.