कोसदणी घाट व मनदेव घाट येथिल दरडी ची दुरुस्तीसाठी मनसेची धडक,काम सुरू

मनसेचा दरारा कायम


राष्ट्रीय महामार्ग ३६१ यवतमाळ कार्यालय विषय-
कोसदणी घाट व मनदेव घाट येथिल दरडी ची दुरुस्ती करणे बाबत.
राष्ट्रीय महामार्ग ३६१ येथील रस्त्याचे काम चालू आहे त्यातच दरडी चे प्रमाण पण मोठे आहे पावसाळा सुरू असल्यामुळे दरडी चे मोठ-मोठे दगड रस्त्यावर येत आहे त्यामुळे लोकांना खूप त्रास होतो त्यातच दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही तिथे कोणता अपघात होऊन नये त्यासाठी आपण संबंधीत कंपनीला आदेश द्यावे हि विनंती करण्यात आली असे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे दरडी आहेत तिथे मनसे चक्काजाम आंदोलन करेल आणि तिथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील असा इशारा देताच त्यांनी चार दिवसांत काम चालू केले.
NH361 च्या संबंधित अधिकाऱ्यां बरोबर चर्चा करतांना देवा शिवरामवार (मनसे जिल्हाध्यक्ष), अनिल हमदापूरे (जिल्हाध्यक्ष मनविसे), सचिन यलगंधेवार(मनसे तालुकाध्यक्ष आर्णी) , सादिक शेख(मनसे तालुकाध्यक्ष उमरखेड)
आदी पदाधिकारी उपस्थित होते.