

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी येथे विद्यार्थी यांचे आल्हाददायक वातावरणात शाळेच्या पहिल्या दिवशी कुमकुम तीलकाने, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, शाळेच्या प्रांगणात माननिय मुख्याध्यापक श्री, अमीन नुरानी सर, संस्था अध्यक्ष माननिय श्रीमान रमेश सुंकुरवार सर,, तसेच सचिव मान, राहुल सुंकुरवार सर व सदस्या मान, सौ, प्राची सुंकुरवार मॅडम यांनी मुलांना पुष्प, गोड खाऊ देऊन स्वागत केले. उन्हाळी सुट्टी,, वार्षिक निकालानंतर पुढच्या वर्गात प्रवेश घेताना विध्यार्थीच्या चेहऱ्यावर उत्साह हा निराळाच दिसत होता स्वागताकरीता सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्त्तर कर्मचारी उपस्थित होते
