
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात आज दिनांक 26 जुलै रोजी दुपारी दोन वाजता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामार्फत शेतकऱ्यांची कर्जमाफी त्वरित करावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा सन 2023 चा वाटप त्वरित करणे,मागील आठवड्यात झालेल्या अति मुसळधार व संततधार पावसाने बाधित शेतकऱ्यांना तात्काळ सर्वे करून आर्थिक मदत देणे, महसूल विभागामार्फत गावात नेमून दिलेले तलाठी आपल्या साज्यावर राहत नाही अशा तलाठ्यांना साज्यावर मुख्यालयी राहण्याबाबत सूचना द्यावी. तहसील कार्यालयात परवानाधारक दस्त लेखक खेरीज व इतर दलालावर कायदेशीर कारवाई करून पायबंध करावे अशा विविध मागण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे तहसीलदार अमित भोईटे यांना देण्यात आले यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके,प्रवीण काकडे,प्रमोद वनकर, रमेश पेंदाम,संजय भोरे,ताणबाजी चिंचोळकर,प्रकाश कुळसंगे, दिगांबर वडुलकर,गौतम नागडे,सुखदेवराव वनकर सुभाष येलेकार, प्रभाकर धोटे यांचे सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते
