नवीन गट विकास अधिकारी यांचा दिशाभूल निर्णय तक्रारी ग्रामसेवक यांना पुन्हा गावचा पदभार , मौजे सारखंनी येथील ग्रामपंचायत येथे अनाधिकृत कामास गती?

पंचायत समिती किंनवट चे नवनिर्वाचित गट विकास अधिकारी यांनी अधिकार हाती घेताच बर्‍याच ग्रामपंचायत येथे सदस्य तथा सरपंच यांच्या मांगणी नुसार ग्रामसेवक यांच्या नियुक्त्या दिल्या आहेत

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकित किंनवट तालुक्यातील बर्‍याच ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता मिळाल्या आहे
करिता गावातील सत्ताधारी यांना हवे तसे कामे करण्यास मुभा मिळाली असल्याचे पाहायला मिळत आहे

मौजे सारखंनी येथे 4 वर्षा अगोदर ग्रामसेवक पदाधिकारी असताना ग्रामसेवक V.M राठोड यांच्या कार्यकाळात शासकीय योजनेत अपहार झाल्या संबंधी गावातून खूप काही तक्रारी गेल्या असल्याने यांचा पदभार काढून दुसर्‍या ग्रामसेवकांना देण्यात आला होता पण सदरील इतिहासाचा विचार न करता नवीन गट विकास अधिकारी पंचायत समिती किंनवट यांच्या कडून पुन्हा ग्रामसेवक यांना पदभार देऊन संधी प्रदान करण्यात आली आहे