मतीमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक करा
( पत्रपरिषदेत केली मागणी, आरोपी मोकाट असल्याचा आरोप )

सहसंपादक : रामभाऊ भोयर

    

राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाठोडा गावातील मतीमंद मुलीचा विनयभंग करण्यात आला.घरात एकटी असल्याची संधी साधून आरोपी किशोर सुखदेव शँभरकर (44) रा. पोहणा याने विनयभंग केला.राळेगाव पो. स्टे. ला या बाबत तक्रार 27 जून रोजी दाखल करण्यात आली मात्र अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही. असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केला.
पीडित मुलीला हृदयाचा त्रास असून त्या दिवशी ती घरात एकटी होती. ही संधी साधून आरोपीने घृणास्पद कृत्य केले. दी. 27 जून रोजी स. 10 वा. ही घटना घडली दुसऱ्या दिवशी शुक्रवारी यवतमाळ येथे मेडिकल करण्यात आले. पी. एस. आय दर्जाच्या अधिकाऱ्याकडे या घटनेचा तपास असतांना अजूनही आरोपीला अटक करण्यात आली नाही अशी तक्रार कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत केली. पंधरवाडा पेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी देखील आरोपी मोकाट असल्याचा आरोप करण्यात आला. आम्ह्लाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली.
सदर प्रकरणात 354,354A, 452,बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपीला अटक करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली.