
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
जन्म असो वा विवाहादी उत्सव याचा नुसता नको गौरव । कुटुंबाचे वाढवावे वैभव । बचत करोनि तुकड्या म्हणे ।। ग्रामगीता ।। या उक्ती प्रमाणे
विवाह प्रसंगी कोणत्याहि प्रकारचे अवडंबर न करता वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ग्रामागीते नुसार मधुकर गेडाम सेवा निवृत्त तहसीलदार राळेगाव यांचे थोरले सुपुत्र सचिन याचा आदर्श विवाह नांदोरा डफरे ता.देवळी जि.वर्धा येथील अतिशय गरीब असलेल्या मडावी परिवारातील सौ .दिपीका हिचेशी दिनांक-20/05/2021 रोजी संपन्न झाला ।
रुढीप्रमाणे कोणत्याही प्रकारची अनिष्ट रुढी,परंपरागत देवाण घेवाण न करता तसेच कोरोना संबंधी शासनाचे सर्व नियमाचे पालन करून समाजाला तसेच शासनाला त्यांनी व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांनी एकप्रकारे मोलाचे सहकार्य केले .
उपरोक्त आदर्श विवाह बाबाराव गेडाम राळेगाव ग्रामगीता तत्वज्ञान प्रचारक यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
