चौथ्या दिवसा पर्यंत ३५ उमेदवारानी केले ७३ अर्जाची उचल
विद्यमान आमदार अशोक उईके यांनी गुरुवारी गुरूपुष्यामृत योग्य साधत उमेदवारी केली दाखल

सहसंपादक : रामभाऊ भोयर

विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज विक्री व स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली असून, राळेगांव ७७ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवणारऱ्या इच्छुक उमेदवारांनी २५ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३५ उमेदवारांनी ७३ अर्जाची उचल केली आहे.
परंतु या चार दिवसात एकमेव भाजपाचे विद्यमान आमदार अशोक उईके यांनी दिं.२४ ऑक्टोबर २०२४ रोज गुरुवार ला गुरूपुष्यामृत योग्य साधत शक्ती प्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली.
दिं २२ ऑक्टोबर २०२४ रोज मंगळवार ला पाच उमेदवारांनी दहा अर्जाची उचल केली दिं २३ ऑक्टोबर २०२४ ला १३ उमेदवारांनी ३० अर्जाची उचल केली तसेच २४ ऑक्टोबर २०२४ ला १० उमेदवाराने १९ अर्जाची उचल केली तर चौथ्या दिवशी २५ ऑक्टोबर २०२४ ला ७ उमेदवारांनी १४ अर्जाची उचल केली असून या चा दिवसात एकूण ३५ उमेदवारांनी ७३ अर्जाची उचल केली आहे मात्र शनिवार रविवार सुट्टी आल्याने केवळ उमेदवारी दाखल करण्याकरिता सोमवार, मंगळवार हे दोनच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारी दाखल करण्याकरिता या दिवसात मात्र मोठी गर्दी पाहायला मिळणारणार आहे.

राळेगांव विधानसभा…

राळेगांव विधानसभा मतदारसंघात शुक्रवार पर्यंत ३५ अर्जदारांनी ७३ नामांकन अर्ज खरेदी केले.मात्र गुरुवारीच गुरुपुष्यामृत योग साधत एकमेव विद्यमान आमदार प्रा.अशोक उईके यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.

२८, २९ रोजी धूमधडाका

नामनिर्देशन प्रक्रियेचे चार दिवस पूर्ण झाले आहेत. आता शनिवार व रविवारची शासकीय सुटी आल्याने फक्त उमेदवारी दाखल करण्याकरिता केवळ सोमवार ,मंगळवार हे दोनच दिवस इच्छुकांच्या हाती उरले आहेत त्यामुळे, २८ व २९ रोजी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

४ नोव्हेंबर रोजी लढत स्पष्ट

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असला तरी ४ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. त्या दिवशी कोणकोण आपले उमेदवारी अर्ज मागे घेईल व कोण रिंगणात राहिले हे समजून येईल. त्यानंतरच राळेगांव ७७ मतदार संघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी व रविवार या दोन दिवसात अनेक राजकीय धक्के बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय घटनांकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.