
आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा येथे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र यावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन विद्यार्थी आणि पालकांसाठी करण्यात आले प्रमुख मार्गदर्शन म्हणून जिल्हा समाज कल्याण जात पडताळणी समितीचे उपायुक्त श्री. विजय वाकुलकर उपस्थित होते बारावी विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहेत आणि लवकरात लवकर हे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देण्याच्या शासनाचा प्रयत्न आहेत असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी सर्व सर्व दस्ताऐवज जमा करून लवकरात लवकर प्रस्ताव सादर करावे असेही त्यांनी सांगितले.
वरोरा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांनीही विद्यार्थ्यांची संवाद साधला जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र वाटपाचे एकत्रित मोहीम 30 सप्टेंबर राबविण्याचे त्यांनी नमूद केले
जात वैधता प्रमाणपत्र बाबतचे संपूर्ण वेळापत्रकाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मृणाल काळे यांनी सांगितले कि विद्यार्थ्यांना शासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जात वैधता प्रमाणपत्र संबंधीची संपूर्ण यंत्रणात आनंद निकेतन महाविद्यालयात येऊन काम करणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा मंचावर नोडल अधिकारी श्री. रमेश मडावी हे उपस्थित होते
विद्यार्थी व पालकांचेही प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे व शंकांचे उपआयुक्तांकडून समाधान केले. कार्यक्रमाला आनंदनिकेतन महाविद्यालया च्या विद्यार्थ्याबरोबर इतर महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्रचार्य प्रा. राधा सवाने. तर संचालन व आभार प्रदर्शन प्रा. रमेश पवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साठी उपप्राचार्य राधा सवाने, प्रा. रमेश पवार, प्रा. किरण लांजेवार, प्रा. संगीता घड्याळपाटील, प्रा. मारोती सोनारखन
यांनी विशेष परिश्रम घेतले
