राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धेत वरो-यातील खेळाडुंचे सुयश ,स्पर्धेत मिळविले ७ गोल्ड , २ सिल्व्हर व १ ब्रांझ मेडल

३० सप्टेबर ते २ आॕक्टोबर २०२३ ला अमरावतीच्या डाॕ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अमरावती जिल्हा आष्टेडु आखाडा असोसिएशन व डाॕ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय उत्तम नगर अमरावतीच्या संयुक्त विद्यमाने १८ व्या राज्यस्तरीय आष्टेडु आखाडा स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते . या स्पर्धेत वरो-याच्या फौजी वाॕरिअर्स च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केलेले आहे .

रीतिक धवने , सानिया आवारी , पियुष विंधाने , वेदिका भोयर , शंतनु ढवने , सोनू निखोडे , फकीरा निखाडे या सात विद्यार्थ्यांनी गोल्डमेडल तर पद्मश्री झुरळे व शोन दसूडे या दोघांनी सिल्व्हर तर वेदांत अतकळे याला ब्रांझ मेडल मिळालेले आहे . फौजी वाॕरिअर्स मार्शल आर्टस् व आष्टेडु आखाडा स्पर्धेत सातत्याने वरो-याचे नाव केवळ राज्यातच नव्हे तर आंतरराष्ट्रिय स्पर्धेतही सातत्याने मोठं करत आहे . सदभावना चौकातील इंदीरा गांधी शाळेच्या आवारात हे सर्व विद्यार्थी गुरु राजु नकवे , प्रविण चिमुरकर , डी. ऐन. खापने , रवी चरुरकर व रविंद्र तुरानकर यांच्या मार्गदर्शनात कसून सराव करतात . या सर्व विद्यार्थ्यांवर वरोरावासियांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे .