
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्यतून आणण्यात आलेले अक्षता कलश खुल्या जीपमधे दर्शनार्थ ठेवण्यात येऊन शोभायात्रा काढण्यात आली. यात्रेत मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. दुर्गा वहिनी, मातृशक्ती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टी, शिवसेना सह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटणाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्य यावेळी हजर होते. यात्रेत ठिकठिकाणी अक्षता कलशची पूजा करन्यात आली, चौकात पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतिशबाजीत यात्रा मार्गस्थ झाली.
शोभायात्रेच्या यशस्वीते साठी संघाचे भुपेंद्र कारीया, सहसंयोजक विकास वाघमारे, मामा चांदे, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष किरण शेजुळ, चित्तरंजन कोल्हे, डॉ कुणाल भोयर, डॉ कैलाश वर्मा,जगदीश निकोडे, प्रतिक गिरी, विनायक महाजन, सुरेश गहरवाल, अनिल वर्मा, बबन भोंगारे, संदीप पेंदोर, फिरोज लाखानी, अर्चनाताई क्षीरसागर, मंगलाताई धोटे, पूनमताई क्षीरसागर, आचल चौधरी, छायाताई पिंपरे, वंदना ताई पोटे, सीमाताई येडसकर, सविताताई पोटदुखे, सूरज गुजरकर, रोहित पिंपरे, सागर वर्मा, कुणाल डंभारे, अरुण देहारे, शुभम मुके, शुभम तोटे, रोहित शिवणकर व अनेक रामभक्त उपस्थित होते,
श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र अयोध्या, अक्षत कलश यात्रेत सहभागी बद्दल संयोजक ॲड प्रितेश वर्मा, यांनी सर्वांचे अभिनंदन करून आभार मानले. शोभायात्रा वसंत जिनिंग पासून निघून बस स्टॅन्ड, क्रांती चौक, मेन रोड, विठ्ठल मंदिर येथून राम मंदिर येथे पोचली.
