गुजरी नागठाणा येथे श्रीमद् भागवत संगीतमय अखंड हरिनाम सप्ताह संपन्न.

सहसंपादक: रामभाऊ भोयर,राळेगाव

मीराबाई महिला भजन मंडळ ‘दुर्गा माता महिला भजन मंडळ ,श्री गुरुदेव महिला भजन मंडळ गुजरी ,शारदा माता महिला भजन मंडळ नागठाणा, व समस्त महिला बचत गट, ग्रामस्थ गुजरी, नागठाणा तालुका राळेगाव यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 18 /2/ 2019 शनिवार ते दिनांक 24/ 2/ 2023 शुक्रवार पर्यंत लक्ष्मी माता मंदिराचे प्रांगणात उत्साहवर्धक ह भ प श्री प्रल्हाद महाराज शास्त्री चिकनी कामटवाडा तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ व संच , सूश्राव्यवाणीतून श्रीमद् भागवत संगीतमय अखंड हरिनाम सप्ताह संपन्न .भागवत सप्ताह निमित्त दैनिक सकाळी ग्रामसफाई व सामुदायिक ध्यान ,काकडा , रामधुन नंतर पहिले सत्र श्रीमद् भागवत कथा दुपारी ग्रामगीता वाचन दुसरे सत्र भागवत कथा सायंकाळी सामुदायिक प्रार्थना हरिपाठ व काकडा ,कीर्तन खंजिरी भजन याप्रमाणे कार्यक्रम संपन्न झाला.दिनांक 18 /2 /23 शनिवारला सकाळी, स्वच्छता अभियान परिवार राळेगाव व गुजरी, नागठाणा यांचे संयुक्त विद्यमाने ग्रामसफाई नंतर हरिभक्त परायण पांडुरंग महाराज यांचे शुभहस्ते अभिषेक ,हरिभक्त परायण पांडुरंग महाराज यांचे शुभहस्ते वसंत बालयोगी अनंत महाराज यांचे उपस्थितीत कलेशस्थापना भूपेंद्र कारिया यांचे मार्गदर्शनाखाली गायत्री परिवार राळेगाव व गायत्री परिवार यवतमाळ यांचे शुभहस्ते पंचकुनडिय महायज्ञ संपन्न दिनांक 24 /2/23 ला सकाळी नागठाणा गावात भव्य शोभायात्रा दिनांक 25 /2/2023 गुजरी गावात भव्य दिंडी सहसभा यात्रा, दुपारी हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज शास्त्री यांचे काल्यावर कीर्तन ,दहीहंडी मान्यवरांचा सन्मान व मार्गदर्शन आणि महाप्रसाद संपन्न .या प्रसंगी ह भ प पांडुरंग महाराज सहारे सराटी, ह भ प रमेश महाराज विलायतकर झाड़गाव, ह भ प अरुण महाराज खंदारे ,ह भ प सदाशिव महाराज परचाके दहेगाव ,ह भ प मुक्ताबाई गोंधळकर दहेगाव ,ह भ प गोपाल महाराज बोलसरे वडकी, ह भ प गजानन महाराज सुरकर सावंगी, ह भ प प्रल्हाद महाराज शास्त्री चिकणी यांचे कीर्तन संपन्न झाले. या सप्ताहात प्रा वसंतराव पुरके माजी शिक्षण मंत्री यवतमाळ, विलासराव भोयर नागठाणा, प्रा आनंद चौधरी एकलारा, डॉक्टर नंदू भाऊ खंदाडे दारवा, सुनील गोंडे पूसद ,डॉ कुणाल भोयर राळेगाव छायाताई गराड कळब, भूपेंद्रजी कारिया, मेघेशाम चांदे, सय्यद युसुफअली राळेगाव, व राळेगाव तालुक्यातील व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी दिल्या, व मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीते करिता गुजरी नागठाणा येथील समस्त पुरुष महिला व युवकांनी विशेष परिश्रम घेतले. व धार्मिककार्या तुन व अध्यात्मातून ” गाव संघटित कसे करता येते” याचे दर्शन “गुजरी नागठाना येथील समस्त नागरिकांनी “या सप्ताह प्रसंगी घडवून दिले ‘.हे विशेष. गुजरी नागठाणा गावात हा प्रयोग प्रथमच यशस्वी झाला असे गावातील नागरिकांकडून व कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.