
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आदिवासी सेलच्या सरचिटणीस पदी राळेगाव येथ सुरेश उत्तमराव मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार तथा आदिवासी सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरामण भिका खोसकर यांनी दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ही महत्त्वपूर्ण निवड जाहीर केली. या निवडीमुळे यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. मेश्राम यांचा प्रदीर्घ राजकीय आणि सामाजिक प्रवास सुरेश मेश्राम यांचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनुभव अत्यंत महत्त्वाचा आहेः सामाजिक कार्यः श्री. मेश्राम यांनी गेल्या ४० वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत गरजूंना मदत केली आहे. पत्रकारितेचा पाया : त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सक्रिय असून, पक्षाशी त्यांची निष्ठा सिद्ध झाली आहे. महत्त्वाची पदे त्यांनी यापूर्वी राळेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती पद यशस्वीरित्या भूपवले आहे. याशिवाय, पक्षांतर्गत त्यांनी उपाध्यक्ष, सर्व जिल्हा सरचिटणीस आणि आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रदेशाध्यक्ष हिरामण भिका खोसकर यांनी नियुक्ती पत्र देताना म्हटले आहे की, श्री. मेश्राम यांनी पक्षाच्या वाढीसाठी आणि आदरणीय ना. अजितदादा पवार व खा. सुनिल तटकरे यांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या दीर्घ अनुभवाचा वापर करून सक्रिय सहकार्य करावे. या महत्त्वाच्या नियुवतीबद्दल सुरेश मेश्राम यांनी राज्यमंत्री इंद्रनील नाईक (सार्वजनिक बांधकाम), वसंतराव घुईखेडकर (प्रदेश उपाध्यक्ष), नानाभाऊ गाडबैले (प्रदेश उपाध्यक्ष), बाळासाहेब कामारकर (जिल्हाध्यक्ष), प्रवीण देशमुख (माजी जिप अध्यक्ष), अरुण राऊत (प्रदेश उपाध्यक्ष), मिलिंद रामटेके (संचालक बाजार समिती बोरी) आणि बाळासाहेब काळे यांचे आभार मानून त्यांना निवडीचे श्रेय दिले आहे.
