
लोकहीत महाराष्ट्र राजुरा ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/DkHZJHNRCOVDPbTRN9QjUq
प्रतिनिधी:उमेश पारखी, राजुरा
सुनील उरकुडे , रितू हनुवंते , विनाेद खाेब्रागडेंची कार्यक्रमात उपस्थिती ! राजूरा: जागतिक पर्यावरणादिना निमित्त आज शनिवार दि.५जूनला राजूरा तालुक्यातील मौजा धिडसी येथे व्रूक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला .या वेळी चंद्रपूर जिल्हा परीषद सदस्य, सभापती सुनील उरकुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती हाेती.या शिवाय या कार्यक्रमात गावातील प्रथम नागरिक सरपंच कुमारी रितु हनुमंते,उपसरपंच राहुल सपाट, सदस्य बंडु काकडे,विनोद कोरडे,सिंधूबाई निखाडे,मायाबाई जिवतोडे,मंगलाबाई ढोके,भूतपूर्व सरपंच मधुकर काळे,सतीश धोटे,डॉ.नारायण काकडे,दत्तु ढोके,पोलीस पाटील सतीश भोयर,ग्रामसेविका अर्चना वरघने ,तलाठी विनोद खोब्रागडे, धिडसी,जिल्हा परीषद उच्च, प्राथमिक शाळेतील शिक्षक,व गावकरी मंडळींनी आपला सहभाग नाेंदवून कार्यक्रम यशस्वी केला .जि.प.उच्च प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या एका छाेटेखानी कार्यक्रमात एक झाड लावून त्याचे जतन करण्यांचा संकल्प वक्त्यांनी व नागरिकांनी या वेळी केला .शाळेच्या परिसरात पिंपळ , अशाेका , वड , अर्जुन आदीं प्रकारची झाडे लावण्यांत आली .
