
*
सहसंपादक ::रामभाऊ भोयर
आदिवासी समाज निसर्गाच्या सान्निध्यात आपलं जीवन जगत असताना सामाजिक आणि धार्मिक परंपरा आपल्या सांस्कृतिक चालिरीती प्रमाणे आनंदाने पार पाडतोय, ही परंपरा वर्षानुवर्षे चालत असल्याने या वर्षी सुध्दा पोपळणी येथे ” कार्तिक दहिहंडी समाप्ती ” कार्यक्रमाचे आयोजन केले होते* या कार्यक्रमात सहभागी दहिहंडी चे उद्घाटक म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या दहिहंडी फोडण्यात आली या कार्यक्रमात सहभागी शरद ग्राम पंचायत चे सरपंच मा सौ वंदना लिलारे या होत्या, तर सहभागी मा कृष्णा जी भोंगाडे, प्रल्हाद काळे, अतिथी मान्यवर उपस्थित होते. कार्तिक दहिहंडी समाप्ती च्या निमित्ताने मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी आदिवासी समाज हा निसर्ग पुजक आहे, गावं गाड्यात चालतं असलेल्या रुढी परंपरा वर्षानुवर्षे आनंद उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करतात आणि गावात बोलावलेल्या गावातील प्रतिष्ठित गणमान्य व्यक्ती चा सन्मान करतात. ही आदिवासी समाजाची संस्कृती आहे, गावात बाहेरच्या महिलांची आणि पुरुषांच्या दिंडी ला बोलावून सर्वांचा सन्मान गुरुदेव सेवा मंडळ पोफळणी च्या गावातील लोकांनी केला ही बाब ” गावं करी ते राव न करी ” हे गावकऱ्यांचे आशिर्वाद आहे म्हणून मा मधुसूदन कोवे गुरुजी यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे आभार मानले या कार्यक्रमात सहभागी सर्व ग्रामवासी, सौ वंदना लिलारे, सरपंच ग्रा पं शरद मा मधुसूदन कोवे गुरुजी, अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच मा कृष्णा जी भोंगाडे दादाराव शिवनकर संजय पवार देवदास आडे शंकर बोचे लक्ष्मन मलांडे शंकर गाडेकर आनंदराव पिंपळे वसंता चिचकार सचिन पिंपळे देविदास टेकाम रघुनाथ मलांडे सुरेश पिंपळे आणि सर्व गावकरी महिला पुरुष सहभागी झाले होते आणि कार्तिकी दहिहंडी समाप्ती कार्यक्रम आनंदानी पार पाडला.
