
सहसंपादक : रामभाऊ भोयर
इंदिरा गांधी कला महाविद्यालय,राळेगाव येथील बी. एस्सी भाग-3 मधील उत्तीर्ण झालेली कु. निकीता गेडाम हिने राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या Joint Admission Test for Masters (IIT- JAM 2024) ही प्रवेश पात्रता परीक्षा भौतिकशास्त्र या विषयात उत्तीर्ण केली. त्यामुळे तिला भारतातील राष्ट्रीय स्तरावरील नामांकित संस्थेत पदव्युत्तर शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातून विविध समस्यांना समोर जाऊन कु.निकिती गेडाम हिने हे यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. वसंतरावजी चिंधुजी पुरके, माजी शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य) यांनी तिचा सत्कार करून अभिनंदन केले. राळेगाव परीसरातील पदवी अभ्यासक्रमाला प्रवेशीत विद्यार्थ्यांनी आपल्या उज्वल भविष्यासाठी तिचे मार्गदर्शन घ्यावे असे महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी सर्वांना आवाहन केले. भौतिकशास्त्र विभागातील प्रा. कपिल डी. जगताप (विभाग प्रमुख), प्रा. भूषण ह. भट्टी व प्रा. अमोल शं. लिहितकर यांचे तिला वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले व तिला ग्रंथलयातून पुस्तके सुद्धा पुरविण्यात आल्या.
