राळेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ


रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांना कुणाचे पाठबळ ? तालुक्यात बोगस डॉक्टरांवर जिल्हाधिकारी यांनी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी डॉक्टर असोसिएशन राळेगाव व तालुक्यातील सुज्ञ नागरिकाकडून होत आहे.


सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव शहरासह तालुक्यात वैद्यकीय कौन्सिल कडे नोंदणी नसणाऱ्या बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडून ऍलोपॅथिक मध्ये प्रॅक्टिस करत रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. यात बंगाली लोकांच्या भरत्या जास्त आहे. राळेगाव, अंतरगाव, चिखली, येवती, चहांद, वडकी, खैरी, किन्ही (जवादे), वाढोणा बाजार, जळका, सरई (निधा), वेडशी सह इतरही अनेक गावात बोगस डॉक्टर असल्याची माहिती पुढे आली आहे. यांना अभय कोणाचे ? असा गंभीर प्रश्न तालुक्यात उपस्थित होत आहे. याच्यावर कोणतीही कारवाही का होत नाही ? काही डॉक्टरांनी तर खोटी सर्टिफिकेट बनवून मोठमोठे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलला सुरू केली आहे.आज सर्वात मोठी संपत्ती म्हणून आरोग्याकडे पाहिले जाते. ज्याचे आरोग्य चांगले आज तोच माणूस जगात श्रीमंत म्हणण्याची वेळ आहे. आज वैद्यकीय क्षेत्र उभारी घेत असताना दुसरीकडे ग्रामीण क्षेत्रात वैद्यकीय व्यवसाय हा निष्कृष्ट रुग्णांना गटविण्याचा धंदा बनवला आहे

 . 

राळेगाव तालुक्यातील अधिकांश क्षेत्र आदिवासी भागात येते या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत अलोपॅथिक औषधी देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळत असणाऱ्या बोगस डॉक्टरांवर त्वरित लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी तालुक्यातुन होत आहे.सदर रुग्णांच्या जीवित अशी खेळणाऱ्या व गरिबांची लूट करणाऱ्या बोगस डॉक्टरांना लोकांच्या डोळ्यासमोर सर्व काही उघडकीस आणून लोकांना या बोगस डॉक्टरांपासून वाचवावे अशी तालुक्यातील लोकांची तसेच डॉक्टर असोसिएशन राळेगाव यांची मागणी आहे