वसंत जिनिंग निवडणूक,संस्थेचा चेहरा मोहरा बदलविण्यात ऍड.देविदास काळे यांचा सिंहाचा वाटा…

वणी :नितेश ताजणे

वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी या संस्थेच्या संचालक मंडळासाठी येत्या ६ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत आहे. वसंत जिनिंगचे अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या वणी, शिंदोला, मार्डी, मारेगाव व मुकुटबन येथे जिनिंग प्रेसिंग युनिट आहे. मागील १० वर्षांपासून ऍड. देविदास काळे वसंत जिनिंग संस्थेच्या अध्यक्ष पदी आहे. वणी, मारेगाव आणि झरीजामनी तालुक्यातील १० हजार ९३४ शेतकरी वसंत जिनिंग संस्थेचे सभासद आहे. यात ७ हजार पेक्षा जास्त सभासद ऍड. काळे यांचे कार्यकाळात जुळलेले आहे.

सहकार पॅनलकडून वर्तमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे, विजय चोरडिया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई व नामदेव सुरपाम संचालक पदासाठी निवडणूक लढत आहे.