

पुसद – स्थानिक लोकहित विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुसद येथे ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाच्या अंतर्गत एक विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शालेय परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य संजीवकुमार वाघमारे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुसदच्या अनुभवीवैद्यकीय टीम उपस्थिती होती. यामध्ये डॉ. रोहित राऊत, डॉ. पंकज जैस्वाल, डॉ. सचिन कोठारी, डॉ. चंदन पांडे, डॉ. अभिजित नालमवार, डॉ. अमोल पाटील, डॉ. अमोल खांदवे, आणि डॉ. प्रिती नवथळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात विविध आरोग्य समस्यांचे निदान करून औषधांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी नितीन धनरे, स्मिता खांदवे, व रुपेश आसेगांवकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. सोना दिक्षित यांनी केले. यानंतर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंगशिराम कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. विनोद शिंदे यांनी मानले. शिबिराच्या आयोजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली, आणि हा उपक्रम विद्यालयाच्या ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग ठरला.
अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होईल आणि त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मदत होईल, असे उपस्थितांचे मत आहे.
