आढावा बैठकीत तहसीलदारांनी कृषी विभागाला फटकारले

महिन्याभरात व मार्गदर्शन कॉर्नर सभा घ्या बोंड अळी चा प्रकोप वाढणार नाही याविषय काळजी घ्या

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


 निधा शिवारात डॉक्टर ज्ञानेश्वर मुडे यांच्या शेतात गुलाबी बोंड अळी असल्याची तक्रार ज्ञानेश्वर मुडे यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना दिली होती परंतु त्यांच्या शेतात पंचनामा करण्याकरिता विलंब झाला याविषयी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांनी तहसीलदार राळेगाव डॉ रवींद्र कानडजे यांची भेट घेऊन कृषी अधिकारी कार्यालय यांना सूचना देण्याची विनंती केली होती यावरून तहसीलदार रांलेगाव यांनी आढावा बैठकीत तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना माफक सूचना देऊन आपल्या कार्याविषयी जागृती करून दिली मागील वर्षी तालुक्यात बोंड अळीचा प्रकोप वाढल्याने कपाशी पिकाची नुकसान झाले शेतकऱ्यांना कपाशी पिकापासून मुकावे लागले सरासरी उत्पन्न कमी झाले यामुळे शेतकरी संकटात सापडला होता यावर्षी परत कपाशीचा पेरा बऱ्यापैकी असल्याने व आंतर मशागत उत्तम प्रकारचे बियाणे रासायनिक खते फवारणी या सर्व गोष्टी करूनही शिवारात गुलाबी बोंड अळीचा शिरकाव झाला परिणामी शेतकरी धास्तावला यामुळे तालुका कृषी अधिकारी मनीषा गवळी पंचायत कृषी अधिकारी रोशन गुलाले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक कृषी मंडळ अधिकारी यांना आपापल्या मंडळात शेतकऱ्यांविषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सूचना तहसीलदारांनी सभेत दिल्या.कृषी विभाग कार्यक्षम नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप .कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक व इतर अधिकारी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत नसल्याची ओरडआहे.