
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक 27/09/2024 रोजी सरकारी रेस्ट हाऊस येथे अशोक मेश्राम यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,या पत्रकार परिषदेला राळेगाव तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते व इतर तळागाळातील कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.सर्वप्रथम कार्यक्रमाची रुपरेषा स्पष्ट करून अशोक मारुती मेश्राम यांनी पत्रकार मंडळीना आपला परिचय करून दिला व विधानसभा निवडणुक अनुषंगाने आपली भूमिका स्पष्ट केली त्यानंतर पत्रकार बंधुनी आपला परिचय करून दिला व प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली
अशोक भाऊ मेश्राम यांनी पत्रकार बंधुच्या प्रश्नाला उत्तर देताना आपली भूमिका स्पष्ट केली की गेल्या दहा वर्षांपासून हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाकडे आहे व त्याचे नेतृत्व माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्राचार्य अशोक उईके करत आहे.हा मतदार संघ जर परत कांग्रेस कडे खेचून आणायचा असेल तर ते धनुष्य मी पेलण्यासाठी समर्थ आहे.कांग्रेसचा हा बालेकिल्ला फक्त आणि फक्त येथील जनप्रतिनिधी नी शुन्य विकास कामे केल्यामुळे विरोधकांकडे गेला पण माझ्या सारख्या नवीन उमेदवाराला काँग्रेस च्या पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास मी नक्कीच त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन ही ग्वाही मी देतो.
मला कोणावरही टीका करायची नाही परंतु या मतदारसंघात निवडून आलेल्या उमेदवाराने आदिवासी व गोरगरीब जनतेसाठी काय केले हे तरी सांगावे किंवा रोजगाराभिमुख उद्योग आणला व बेरोजगार तरुणांना रोजगार दिला हे तरी सांगावे.राळेगाव मतदार संघ असतांना सुध्दा जिल्हा ठिकाणी राहणे व जनतेला वाऱ्यावर सोडणे कितपत योग्य आहे,मी स्वतः तर राळेगावला आपली कर्मभूमी मानुन इथेच चोवीस तास मतदारसंघात जनतेची सेवा करण्यासाठी उपलब्ध आहो,मला कोणत्याही क्षणी फोन करा मी माझ्या जनतेचे समाधान करण्यास अपयशी ठरलो तर जनतेने माझा विचार करु नये,मी फक्त आणि फक्त जनतेची सेवा करण्यासाठी या मतदारसंघात आपली उमेदवारी दाखल केली आहे,मला राजकारणातून भ्रष्टाचार करुन पैसा कमवायचा नाही, जगण्यापुरते पेन्शन मला सरकार देत आहेस. असे सडेतोड उत्तर अशोक मेश्राम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
