विदर्भ उपाध्यक्षपदी सुवर्णा वैद्य तर जिल्हाध्यक्षपदी आर्यन कांबळे यांची निवड

पत्रकार व वंचित घटकांना न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघ : गणेश कचकलवार

महाराष्ट राज्यातील सर्व जिल्ह्यात मोठ्या जोमाने कार्य सुरू आहे. पत्रकार यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेले तथा समाजातील वंचित घटकांना न्यायासाठी धडपड करणारे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी विदर्भ उपाध्यक्षपदी सुवर्णा सचिन वैद्य तर जिल्हाध्यक्षपदी आर्यन कांबळे यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर नियुक्तीचे कारण दोघांची पण कामगिरी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची कार्य अविरत व सातत्य त्यांच्या कार्यातून दिसत असल्यामुळे यांची नियुक्ती करण्यात आली व आशा केली की अशाच पूर्ण ताकतीनिशी तन-मन-धनाने कार्य करण्यासाठी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जिल्ह्याचे कार्याध्यक्ष पवन चंबुलवार व महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी बाबर , तालुका प्रमुख तुषार रेड्डीवार , पंकज तडस , मनवर शेख ,रवींद्र पारीसे , भाउराव कोटकर , अमोल ठाकरे , शंकर परचाके , प्रज्वल भेदुरकर , सचिन महाजन , कृष्णा काकडे , विनोद नक्षिने , दुर्वेश डफ , रियाज पटेल , अब्दुल कादीर , विठ्ठल पिंजरकर , आदित्य सिडाम , अतुल काकडे , आशिष जाचक , शेख फरिदिन , रवींद्र तुबडे , दिलीप ठाकरे , ताराचंद ढगे , जयंत दूरबुडे , रेणुका दूरबुडे , हर्षाली सातघरे , योगिता काकडे इत्यादी वर्धा जिल्हा पदाधिकारी सर्वांनी आनंद व्यक्त करीत शुभेच्छांचा वर्षाव केला.