वैकुंठ धामात किफायतशीर दरात लाकडं उपलब्ध,राळेगाव नगर पंचायतीचा उपक्रम

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर

नगर पंचायत राळेगांव च्या वैकुंठ धामात किफायतशीर दरात लाकडं उपलब्ध करुन देण्यात येत आहे…वैकुंठ धामाच्या देखभालीसाठी नपंरा चे वतीने अशोक वामन घनसरवाढ यांची चौकीदार म्हणून नियुक्ती केली आहे. सहपरिवार चोवीस तास वास्तव्य असून स्मशानभूमीत राहण्याची सोय नपंरा ने केली आहे..इतर वेळी जंगलातून, विकत घेतलेली लाकडे आणून किफायतशीर दरात दहनविधी साठी नातेवाईकांना उपलब्ध करुन देण्यात आल्यानं चांगली‌ सोय जागेवरच झाली आहे.. दहना साठी लाकडे रचून देणं, तिसऱ्या दिवशी रक्षा जमा करुन देणं ही कामं यात सामील आहे..या व्यतिरिक्त परिसरात साफसफाई करणे, झाडांची निगा राखणं, पाणी देणे, ही कामे चांगल्या प्रकारे होतं आहे..पालकमंत्री संजय राठोड यांनीही मोक्षधाम सोंदर्यीकरण कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्धकरून दिल्याने कॉक्रीट दहनशेड, विद्युतरोषणाई सह बरीच आवश्यक कामे पूर्णत्वास जात असल्याने मोक्षधाम परिसराचा चांगला चं कायापालट झाल्याचे दिसून येत आहेमाॅर्निंग पार्क गृप च्या वतीने स्मशानभूमीत अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या ने परिसर सर्वांगसुंदर झाला आहे हे विशेष…