
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व संस्कार केंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त भगवान शिवाला प्रिय असलेल्या रुद्र अभिषेक करून आपली भक्ती अर्पण केली.
शहरात प्रथमच असा कार्यक्रम घेण्यात आला. रुद्र अभिषेक सेवेचे तीर्थ अमृतासमान दिव्य असते.सर्व सेवेकऱ्यांनी भगवान शिवाच्या उच्चकोटीच्या सेवेला उत्फुर्त प्राधान्य प्रतिसाद दिला.
श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राची शिस्त ही नेहमीच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहिले हे विशेष. सर्व सेवेकऱ्यानी सेवा देण्याची वृत्ती ठेवली. तसेच आजारी व्यक्तीला रुद्र अभिषेक तीर्थ प्राशन केल्याने त्या व्यक्तीसाठी अमृतासमान असते. रुद्र अभिषेक सेवेचे महत्व केंद्र प्रमुख पूनम चव्हाण यांनी भाविक भक्तांना सांगितले.
साडेदहा वाजता महाआरती घेण्यात आली. महाप्रसादाचे वितरण यशस्वीरित्या करण्यात आले . श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राचे भक्तिमय वातावरण व शिस्त सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
कार्यक्रमाचे नियोजन केंद्र प्रमुख पूनम चव्हाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
केंद्र प्रतिनिधी योगिता चिन्नावार, प्रभा सूर्यवंशी, सुजाता येरावार, मोहिनी औटकर, निकिता रावते,पूजा पवार, गजानन रावते, विक्की चव्हाण, बंटी उर्फ नरेश मुक्कावार,अभिजित कदम, प्रशांत पंडीतकर व सर्व सेवेकऱ्यानी यावेळी आपली भक्ती रुपी सेवा अर्पण केली.
चौकट5
ईश्वराची भक्ती करत असताना भोळ्या भावाची भक्तीची एकतारी रूपाने सेवा करावी लागते. भक्तीचे भुकेले भोलेबाबा खऱ्या अर्थाने असतात. या अभिषेकला उपस्थित भक्ताचे पुण्य फळाला आले असेल म्हणूनच रुद्राभिषेकाला अनेक भक्तगण उपस्थित होते. शंख, त्रिशूल, मस्तकी वीभूती असलेल्या भोले बाबाला अभिषेक केल्यामुळे एक प्रकारची सकारार्थी ऊर्जा निर्माण झाली .सगळ्या भक्तांच्या चेहऱ्यावर एक दिव्य झळाळी यावेळी दिसत होती. स्वर्ग सुखांचा आनंदमय सोहळा यावेळी पार पडला भक्तांसाठी नेहमीच भोले बाबा कृपाळू राहिलेले आहेत व दुःखितांसाठी व शोषितांसाठी दयाळू असतात.
