

सहसंपादक : रामभाऊ भोयर
ऊर्जा मंत्रालय भारत सरकार यांनी देशात ऊर्जा संवर्धनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी माहिती पुरवणे व ऊर्जा बचतीसाठी देशात तसेच राज्यात आवश्यक त्या सर्व योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने नेहरू विद्यालय सावरगाव येथे सन 2022 23 या शैक्षणिक क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमता व त्याचे संवर्धन यासाठी राज्य ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजना चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांचे दोन विभाग करून ऊर्जा क्लब स्थापन करण्यात आला. यामध्ये विद्यालयातील जवळपास 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून ऊर्जा बचतीचे महत्त्व घरोघरी जाऊन पटवून दिले.
देशात ऊर्जेची मागणी वाढत असून ऊर्जा संवर्धनाच्या वेगाने रास होत आहे त्यासाठी भविष्यातील ऊर्जा कपात कमी करण्यासाठी ऊर्जेची बचत करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ऊर्जा मित्र श्री अक्षय जगताप सर व व श्री गजानन तुमराम सर यांनी आपल्या भाषणातून केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री प्रवीण भाऊ देशमुख हे अध्यक्षस्थानी होते तर श्री.आनंदरावजी जगताप सर व श्री वनस्कर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते वरील मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वाटप करून स्मृतीचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले
कार्यक्रमाचे संचालन श्री तुषार देशमुख सर तर आभार प्रदर्शन श्री पुरुषोत्तम शेंडे सर यांनी केले.
