गुरुकुंज सेवाश्रमाचे नवनिर्वाचित सर्वाधिकारी मा.श्री. लक्ष्मणरावजी नागरी सत्कार सोहळा संपन्न



दिनांक 20/01/2023 ला दुपारी 3.00 वाजता नागरी सत्कार समिती, वरोरा मार्फत सर्वाधिकारी मा. श्री. लक्ष्मणरावजी गमे यांच्या नागरी सत्कार सोहळा 2023 आयोजीत करण्यात आला. वरोरा परिसरातील भूमीत जन्म घेऊन, महाराष्ट्र स्तरावरील एक लोककल्याणकारी व कर्तुत्ववान व्यक्तीमत्व म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या मोझरी येथील गुरुकुंज सेवश्रमाचे नवनिर्वाचित सर्वाधिकारी मा.श्री. लक्ष्मणरावजी गमे हे एक होत. गेल्या काही वर्षापासून आपल्या क्षेत्रातच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये श्री क्षेत्र गुरूकुंज आश्रम, मोझरी या संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे
जनसामाण्यापर्यंत पोहचवण्याचे व रुजवण्याचे कार्य मा.श्री. लक्ष्मणरावजी गमे करीत आहेत. त्यांच्या समर्पणाची व कार्याची दखल घेत अखिल भारतीय श्री. गुरूदेव सेवा मंडळ, मोझरी या संस्थेमार्फत त्यांची सर्वाधिकारी या पदावर अलीकडेच नियुक्ती करण्यात आली आहे. वरोरा नगरी मधील एका व्यक्तीला या सर्वाधिकारी पदाचा मान मिळाल्यामुळे वरोराकरांची मान उंचावलेली आहे. मा.श्री. लक्ष्मणरावजी गमे यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मात्र पितृ ऋन प्रीत्यर्थ श्री चेतन जी शर्मा यांचा देखील शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. मोरेश्वररावजी टेमुर्डे साहेब , माजी उपाध्यक्ष विधानसभा , महाराष्ट्र राज्य, प्रमुख पाहुणे मा. श्री, विकास भाऊ आमटे, सचिव, महारोगी सेवा समिती, वरोरा, तसेच मा. श्री. नरेशबाबु पुगलिया , माजी. खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र जय गुरूदेव स्वच्छ जल संस्थेचे अध्यक्ष श्री रमेश राजुरकर , श्री सुधाकररावजी कडू, विश्वस्त , महारोगी सेवा समिती, वरोरा, श्री करणजी देवतळे, प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा ,नागरी सत्कार समितीच्या अध्यक्ष सौ. सुवर्णरेखाताई पाटील, श्री अहेते श्यामजी आली, श्री छोटू भाऊ शेख, श्री विनोदजी मालू , श्री नितेशजी जैस्वाल, श्री ठेंगणे सर, श्री गजाननराव जीवतोडे , श्री रुपलालजी कावळे, श्री राजेश भाऊ ताजने, गुरुदेव सेवा मंडळ, वरोरा चे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक , श्रवरोऱ्यामधील भव्य संख्येने नागरिक उपस्थित होते.