शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोरभाऊ तिवारी यांचा गाडेघाट येथे सरकार आपल्या दारी कार्यक्रम

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

शेतकरी स्वावलंबन मिशनचे किशोरभाऊ तिवारी यांचा आज दि 13 सप्टेंबर रोजी वडकी गाडेघाट दौरा होता
या दौऱ्यात त्यांनी गाडेघाट या गावात सरकार आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला तेथील आदिवासी नागरिकांच्या असलेल्या समस्या जाणुन घेतल्या असुन त्या वेळी कार्यक्रमात असलेल्या अधिकाऱ्यांना समस्या लवकरात लवकर निकाली लावण्यास सुचना दिल्या व असलेल्या समस्या लवकरात लवकर निकाली लाऊ असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले यावेळी गटविकास अधिकारी रवीकांत पवार नायब तहसिलदार बदकी मंडळ अधिकारी पोटे, तलाठी कोडापे देवळे पोलीस कर्मचारी भोयर आरोग्य कर्मचारी कोवे व अन्य कर्मचारी पिंपरी गाडेघाट सरपंच उपसरपंच सामाजीक कार्यकर्ते शंकर मांदाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.