
कळंब तालुक्यातील पार्डी येथे आज महिला सशक्तिकरण व शाश्वत उपजीविका या विषयावर प्रभावी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्पेक्ट्रम फाउंडेशन, वर्धा यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजू तायडे (निरीक्षक) जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, यवतमाळ भुषण दहीकर (पर्यवेक्षक) जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ, यवतमाळ श्री. शुभम कोडलवार (केस वर्कर) जिल्हा बाल संरक्षण, यवतमाळ अश्विनी येकुणकार (क्लस्टर कोऑर्डिनेटर) सेंद्रिय शेती लता मेंटॉल (स्टेट कोऑर्डिनेटर) कुटुंबश्री, केरळ देविका मॅडम (मनिपुरम)श्री. अमितभाऊ पिसे (सरपंच) पार्डी
या सर्वांनी उपस्थितांना शाश्वत उपजीविकेवर सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
स्पेक्ट्रम फाउंडेशन, वर्धा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर श्री. मोहन बरडे यांनी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शन केले. प्रस्ताविक रूपाली तडस (जेंडर लीड) यांनी सादर केले, तर सूत्रसंचालन आणि आयोजनाची जबाबदारी लक्ष्मण येडसकर यांनी पार पाडली. आभार प्रदर्शन रेणुका चौखे (जेंडर लीड) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशासाठी फील्ड फॅसिलिटेटर्स — प्रियंका ओमकार, नागसेन सुटे, वैभव मेघळ, आनंद मांढरे, हितेश भोयर — तसेच प्रेरणा ग्रामसंघ, पार्डी यांनी मोलाचे योगदान दिले.
स्थानिक महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमाने महिलांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा नवा मार्ग दाखवून शाश्वत उपजीविकेच्या संकल्पना प्रभावीपणे पोहोचवल्या.
