गारपिटीच्या माऱ्यामुळे टरबुजाच्या फळबागेचे झाले नुकसान शेतकऱ्याला भरपाई कधी मिळणार?


जिल्हा प्रतिनिधी :प्रविण जोशी
यवतमाळ


टरबूज हे खाण्यास मधुर व विविध खजिनांचे व शरीराला पाहिजे असलेले अनेक जीवनसत्वे घटक यामध्ये आढळतात आणि प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये तर पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे हमखास एका चकाकणाऱ्या काचेच्या प्लेटमध्ये टरबुजाच्या गोड मधुर व रुचकर असे टरबूज देऊन पाहुणे मंडळीचे स्वागत आणि हिमाकत केली जाते पण त्याच टरबूजाने यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

ढाणकी पासून जवळ असलेल्या मौजा कृष्णापुर येथील प्रगतिशील शेतकरी समाधान बाभळे हे फळपीक घेण्यासाठी पंचकोशीत प्रसिद्ध आहेत व अनेकांना सीताफळ व इतर फळांविषयी नेहमीच मार्गदर्शन करून फळ पिकावर आलेल्या प्रत्येक पिकावर त्यांच्याकडे हमखास विलाज रुपी औषध आहे त्यामुळे अनेक शेतकरी मोठ्या आशेने मार्गदर्शन साठी त्यांच्या कडे येत असतात पण अनेकांना मार्गदर्शन करणारे समाधान बाभळे यांच्या टरबूज पिकावर निसर्गाची अवकृपा झाली मार्च महिन्यातील पडलेल्या गारपिटीमुळे एक हेक्टर वरील टरबुजाचा फड पूर्णपणे खराब झाला असून फळ खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे शेतकरी मात्र नुसताच बघत राहिला गाराचा मारा एवढा जोरात होता की टरबूज अक्षरशः फुटून गेले निसर्गाने दिलेले कधीच संपत नाही तर नुकसान झाले तर ते अर्थरूपाने कधीच भरून निघणार नाही या आधी ज्या क्षेत्रामध्ये टरबूज आहे त्या ठिकाणी कापसाची लागवड केली होती पण यावर्षी अतिरिक्त पाण्याच्या वृष्टीमुळे कापसाची सुद्धा नापिकी झाली त्यामुळे दोन्ही पिकांना निसर्गाने दिलेल्या मारामुळे समाधान बाभळे यांचे अगणित नुकसान झाले मात्र राजकारन्याना याचे काहीही घेणे देणे नाही बरोबर शेतकऱ्याचा माला बाजारपेठेत आला म्हणजे भाव पाडला जातो टरबूज पिकाचा पंचनामा तर झाला पण मिळणारी तुटपुंजी मदत कधी व किती मिळणार हा औसुक्याचाच विषय बनला आहे भारत देशाचा आर्थिक कणा म्हणून शेतकऱ्याला नेहमीच म्हटले जाते पण भाव पाडून शेतकरी नागवल्या जातो हेच येतील बळीराजाची दुर्दैव आहे