झरी बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

झरी बाजार समितीत महाविकास आघाडीचे १८ पैकी १८ सदस्य निवडून आले. युतीचा या निवडणुकीत सुपड़ा साफ झाला झरी येथील बाजार समितीवर सभापती म्हणून काँग्रेसचे अॅड. राजीव कासावार हे निश्चित आहे. तर उप सभापती पद हे शिवसेने ला मिळणार आहे. शिवसेनेचे 6 संचालक निवडून आले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख मा. आमदार विश्वास नांदेकर यांच्या मताने निवड होणार आहे. जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या आदेशाने उपसभापती पदाची निवड होणार आहे. सभापती व उपसभापती यांची निवड २१ मे रोजी रविवार ला होणार आहे वरीलबाब प्रसिध्दी पत्रका द्वारे निलेश बेलेकार, मंगेश मोहितकार यांनी कळविले आहे.