कोपरी येथे एक गांव एक उत्सव संकल्पनेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

राळेगांव तालुक्यातील कोपरी या गावात १३ फेब्रुवारी २०२३ गजानन महाराज प्रगट दिनापासून एक घर एक उत्सव राबवित असून त्यानुसार येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे.
यावेळी येथील सरपंच प्रवीण नरडवार यांनी गावात एकोपा व शांतता राहावी यासाठी पुढाकार घेऊन व त्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व समाजातील नागरिक एकत्रित येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी केली .
सर्वप्रथम गावकऱ्यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली .त्यानंतर सन्मानीय मंडळींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले . तर सायंकाळी सर्व गावकऱ्यांनी भोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे .या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.