
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सोयाबीन पीक विमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करून,तातडीने निधी वितरित करावा मा.दत्तात्रय भरणे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई तालुका कृषी अधिकारी,कळंब यांच्या मार्फत निवेदन सादर सोयाबीन पीकविमा योजनेत यवतमाळ जिल्ह्याचा समावेश करावा तसेच तातडीने निधी वितरित करण्यात यावा यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्या ग्रस्त जिल्हा अशी ओळख निर्माण झालेली असताना..सतत होणारी नापिकी, अवेळी येणारा पाऊस यामुळे जिल्ह्यातील शेतकरी राजा ञस्त झालेला आहे..यवतमाळ जिल्हा पीक विमा योजनेतून वगळून शेतकर्यांच्या वर अन्याय झालेला आहे…शासनाचे काय निकष आहे..कशा पद्धतीने पीकविमा कंपनी शेतकर्यांच्या बांधावर न जाता टेबलावरती आकडे देतात..आम्हा शेतकर्यांना माहिती नाही यावेळी शेतकरी वर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.शेतकरी डबघाईस आलेला आहे..तातडीने यवतमाळ जिल्ह्याचा पीक विमा योजनेत समावेश करावा..व जिल्ह्यातील शेतकर्यांना दिलासा द्यावा..अन्यथा आम्ही शेतकरी आंदोलनाला सामोरे जाऊन असा इशारा देण्यात आला..यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष मनिषा काटे (भोसले) , तालुका अध्यक्ष दिलीपराव इंगोले , युवक तालुकाध्यक्ष अध्यक्ष ओमकार चव्हाण, विजय पोटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले…यावेळी लक्ष्मण ढाले,प्रहार चे विरेंद्र चव्हाण, विनायक सनराटे,अमोल मलकापुरे, सखाराम सहारे, महानंदा रामटेके, विरू जाधव, रोशन केराम,सूर्यभान टेकाम , दिलीप चव्हाण,सुरेश मेश्राम,रमेश पवार, निरंजन राठोड, सखाराम सहारे, रविन्द्र चिंचाळ्कर आदीची उपस्थिती होती..
