

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील सुपुत्र अक्षय निखुरे पाकिस्तान च्या सीमेवर अपघातात शहीद झाल्याची घटना घडली आहे.काही वर्षा आधीच सैन्यात सामील झालेल्या अक्षय नीखुरे याचा काल पाकिस्तान सीमेवर झालेल्या एका अपघातात शहीद झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.मराठा बटालियन ची चमू जात असताना वाहन खोल दरीत कोसळत 18 पैकी 5 जवानांचा मृत्यू झाला आहे.वयाच्या 21 व्या वर्षी सैन्यात भरती झालेल्या अक्षय च्या घरी 4 एकर शेती आहे.आई व वडील शेतकरी आहे . मुलाला सैन्यात पाठवत मातृभूमीची सेवा करत असताना वीरमरण आले .त्यांच्या स्वागवी उद्या 26 डिसेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.
