
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील विहिरगांव गावामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत नागरिकांना पाण्याची सुविधा मिळण्याकरिता अनुदान आले असून सदर अनुदानातुन विंहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यात आले संपूर्ण गावात पाईप लाईन टाकण्यात आली परंतु अजूनही पाण्याच्या टाकीचे बांधकाम हे विहिरगांव या गावांमध्ये चालू करण्यात आले नाही. सदर टाकीचे बांधकाम केव्हा सुरू करण्यात येईल नाहीतर फक्त टाकीच्या जागेवर जीसीपी ने खड्डा करून राहील का असा प्रश्न विहिरगांव वासीयांना पडला आहे फक्त विहीर खोदकाम करून गावामध्ये नळ पाईप लाईन टाकून डायरेक्ट विहिरीवरून पाणी गावामध्ये सोडले जाते व ते पाणी वेस्टेज वाया जात असल्याच दिसून येत आहे कारण कुठे कुठे नळ कनेक्शनच लावलेले नाही आहे या वेस्टेज पाण्यामुळे गावातील गल्ली रस्त्यात चिखल होत असल्यामुळे त्या सांड पाण्यामुळे रोग मच्छराच प्रमाण वाढलेल दिसत आहे गावकऱ्यांना असे वाटत होते की, टाकीचे काम लवकर होईल आणि ग्रामस्थांना त्या टाकीचे पाणी पिण्यासाठी मिळेल परंतु सदर पाण्याच्या टाकीचे बांधकाम एक वर्ष झाले तरी सुरू करण्यात नाही आले अशी ओरड ग्रामस्थांतून होत आहेत. केव्हा या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाला मुहूर्त मिळेल की नाही. असे प्रश्न विहिरगांव येथील नागरिकांना पडले आहे. सदर कोणतेही काम करताना कामाकडे लक्ष देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असते.
परंतु या बाबीकडे ग्रामपंचायत तथा लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने असे प्रकार डोळ्यासमोर पाहायला मिळत आहे. तरी याकडे विहिरगांव गावातील सचिव,सरपंच उपसरपंच यांनी लक्ष देऊन या टाकीच्या बांधकामासाठी कुठे पाणी मुरत आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. काम का सुरू नाही झाले याबाबत लोकांना माहिती नाही . नुकताच उन्हाळा सुरू झाला असल्याकारणाने या ऋतूमध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी ग्रामपंचायतने तत्काळ उपाययोजना कराव्या आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम तत्काळ सुरू करावे. अशी मागणी विहिरगांव ग्रामस्थांमधून होत आहे.
