येणारा काळ शिक्षकांसाठी संघर्षाचाच असेल ; सर्वांनी संघटनेत एकजूट होवून लढावे
राज्याध्यक्ष विजय कोंबे

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राज्य प्राथमिक शिक्षक समिती राळेगाव च्या, वतीने यवतमाळ जि. प. कर्मचारी सहकारी पतसंस्था र.न.१०९ येथे नवनियुक्त अध्यक्ष महेश सोनेकर यांची निवड करण्यात आली त्यांचा सपत्नीक सत्कार सोहळा तसेच तालुक्यातील ४० सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा दिं २३ मार्च २०२४ रोज शनिवारला कोल्हे सभागृह येथे पार पडला असून या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले असून येणारा काळ हा शिक्षकांसाठी संघर्षाचा असणार आहे त्यासाठी सर्वांनी संघटनेत एकजूट होऊन लढण्याचे काम केले पाहिजे असे वक्तव्य या सत्कार सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद धोटे, कार्याध्यक्ष, प्राथमिक शिक्षक समिती राळेगाव हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विजय कोंबे राज्याध्यक्ष,महा, राज्य प्राथमिक शिक्षक समिती तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षक नेते नानासाहेब नाकडे ,गजानन देऊळकर, माजी सचिव,शिक्षक समिती यवतमाळ, विलासभाऊ गुल्हाने,संदीप मोहाडे,जिल्हा सरचिटणीस समिती यवतमाळ, बबनराव नगराळे संजय गावंडे उपाध्यक्ष १०९ पतसंस्था, मुकेश भोयर माजी सचीव १०९ पतसंस्था, आशन्ना गुंडावार अध्यक्ष ग्राहक भंडार , जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुनीता जतकर, सरलाताई देवतळे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सरलाताई देवतळे , रवी नंदुरकर मिलिंद अंबलकर उपस्थित होते.
एक सामाजिक जाण ,तसेच विद्यार्थ्याप्रती आपुलकी असणारे, कर्वतव्यदक्ष शिक्षक म्हणून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात ज्यांची ओळख, असे नवनियुक्त अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा क. पतसंस्था १०९ चे, महेश सोनेकर यांचा सपत्नीक सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राळेगाव संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राळेगाव च्या वतीने सामाजिक ऋण जपत आपले संपूर्ण आयुष्य शिक्षकी पेशात खर्ची घालणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षक बबनराव नगराळे ,सौ.सर्लाताई देवतळे मॅडम,गजाननराव यादव ,हेमंत निंबुळकर,वाल्मीक मुडे रमेशमाकोडे, सुरेश राऊत ,नामदेव तिजारे ,किसन चौधरी उद्धव चौधरी सर आदी ४० सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती सोनेकर सर यांनी सत्कराब्बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष धोटे सर यांनी. सत्कार मूर्ती, सोनेकर सर यांचा जीवनपट विषद केला. सदर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय दुर्गे यांनी केले तर सूत्रसंचालन अमोल पोहनकर आणि वसुंधरा माकोडे यांनी केले तर सन्मान कर्तुत्वाचा या कार्यक्रमाचे संचालन शुभदा येवले यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार सुभाष पारधी यांनी मानले.तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत सिडाम तालुका सरचिटणीस, तथा कार्यकारणील पदाधिकारी पुंडलीक देवतळे, संजय एकोणकर, विनायक एकोनकर, विजय उगेमुगे, राजेन्द्र एकुनकर, संदीप क्षिरसागर, संदीप टुले, सागर धनालकोट्वार, हनुमान जुमनाके, सुजीत येंडे यांनी अतिशय मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.