
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दिनांक 3/7/2026 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या राळेगाव मतदार संघाच्या राळेगाव येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात तर कळंब व बाभुळगाव तालुक्यातील बि.एल. ए. / बुथ लेव्हल एजंटचे एकदिवसीय प्रशिक्षण जिवनदिप आश्रमशाळा कळंब येथे संपन्न झाले. या प्रशिक्षणात एस.आय.आर.संदर्भात विविध बाबींवर सविस्तर माहिती देण्यात आली.त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांच्या सह डॉ.प्रताप परभणीकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले..या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना एस.आय. आर. प्रक्रियेचे महत्व, मतदार यादी अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तसेच प्रत्येक बुथवर संघटन मजबूत करण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.या कार्यक्रमात कार्यकर्ते व बुथ प्रमुखांनी नोंदणी, पडताळणी आणि जनजागृती यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.या प्रशिक्षणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न विचारून शंकेचे निरसन केले. यादरम्यान या शिबिराला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड प्रफुल्ल मानकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे संचालक अरविंद वाढोणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे शहराध्यक्ष प्रदीप ठुणे अँड सिमा तेलंगे कळंब तालुक्यातील महादेव काळे तालुका अध्यक्ष कळंब,सरोश सिद्धिकी, कळंब शहराध्यक्ष राजेश काटेकर, बाभुळगाव तालुका अध्यक्ष अमेय घोडे,सोबतच तिन्ही तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, बुथप्रमुख यांच्या सह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
