
सहसंपादक : रामभाऊ भोयर
न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव चे दिनांक 15 नोव्हेंबर शनिवारला राळेगाव येथील लोकप्रिय तलाव उद्यान येथे शासनाच्या आदेशाप्रमाणे विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत एक दिवसीय क्षेत्र भेट शैक्षणिक सहली चे आयोजन करण्यात आले होते.राळेगाव येथील नगरपंचायतच्या तलाव उद्यानास उपक्रमा अंतर्गत भेट देण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांना उद्यानामध्ये असणाऱ्या विविध फळ, फुलांच्या झाडांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे उद्यानाच्या बाजूने असणाऱ्या प्रशस्त अशा तलावातील विविध पक्षी व जलपर्णी वनस्पतींबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली… या एक दिवसीय असणाऱ्या शैक्षणिक सहली बद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मोठे कतूहल दिसून आले. शाळेतील या एक दिवसीय क्षेत्र भेट शैक्षणिक सहलीच्या आयोजना करिता शाळेतील शिक्षक विनोद चिरडे, मनीषा इखे,कु. वैशाली चौधरी, करुणा महाकुलकर, कु. जया ठवरी, कु. अनुजा जुमनाके, विनोद तायडे निलेश गोरे,कु रेश्मा भोयर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले या एक दिवसीय शैक्षणिक क्षेत्रभेट सहलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला…
