ट्रक व ट्रॅव्हल्सच्या अपघातात दोघांचा मृत्यू

जण मोठ्या प्रमाणात जखमी ; मृतदेह काढले आधुनिक यंत्राच्या मदतीच्या सहाय्याने


प्रतिनिधी,प्रवीण जोशी
उमरखेड


ता. २८ : वेगाने ट्रॅव्हल्स व ट्रकच्या आमने सामने झालेल्या धडकेत ट्रक व ट्रॅव्हल्सचे चालक यांचा जागीच मृत्यु झाला तर ट्रकमधील वाहक गंभीर स्वरूपात जखमी झाला आहे.
महागांव तालुक्यातील मुडाणा येथील शिवतेज धाब्यासमोर मंगळवारी (ता.२८) रोजी सकाळी अंदाजे साडेसात वाजताच्या दरम्यान महागांवकडुन नांदेडकडे दगडी कोळसा घेवुन जाणार ट्रक क्र.एम एच २६ बि इ ४१२१ व नांदेडकडून नागपुर जाणारी मार्को पोलो कंपनीची विना नंबरची ट्रॅव्हल्स यांची समोरासमोर धडक झाली ही दोन्ही वाहने अत्यंत सुसाट वेगाने असल्याने व अचानक आमने सामने आल्याने एकमेकांना धडकली ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चकणा चुर होवुन ट्रक चालक अरुण पुंडलिक सिरसे (वय ४२ वर्षे) रा.अमुलगा जि.नांदेड व ट्रॅव्हल्स चालक बापी मकरा कर्मकार (वय ३०) रा.बेलाजुडी जि.पुर्व सिंहमुंजी (झारखंड) हे दोघेही जागीच ठार झाले तर ट्रकच वाहक साई दगडू कदम (वय २५ वर्षे) रा.शिरसी जि.नांदेड हा गंभीर जखमी झाला होता. दोन्ही मृतदेह हे अपघात झालेल्या वाहनातच अडकुन पडल्याने गावकऱ्यांनी आधुनिक तंत्राच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढले तर जखमींना उपचारासाठी हलविले. या घटनेची महिती मिळताच जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतिश खेडेकर, महागांव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल वानखेडे हे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात हलविले महामार्ग गुळगुळीत झाला असला तरी अपघातांची मालिका मात्र थांबायला तयार नाही त्यामुळे ही नक्कीच चिंतेची बाब आहे